मुंबई | कोरोनामुळे देशात मोठे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक चक्र सुरळीत चालण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेज घोषणा केली. यासंदर्भात आपली निरिक्षणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रातून कळवली आहेत. शेतीक्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी होणार? संकटात सापडलेल्यांना कधीपर्यंत निधी मिळणार? हे सरकारने स्पष्ट करावे, असे सवाल शरद पवारांनी उपस्थित केले आहे.
I have raised concerns and shared my views in an open letter to Hon’able Prime Minister Narendra Modi ji over the scope of the 20 trillion package announced by him in the wake of the coronavirus-led damages. @PMOIndia @narendramodi @nsitharaman @ianuragthakur @FinMinIndia pic.twitter.com/PSDRe95naP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2020
दरम्यान, शेतकरी, मच्छिमार, दूध उत्पादक, मधमाशी पालन आणि छोट्या अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींच्या पॅकेजमधून ज्या घोषणा केल्या आहेत. सरकारच्या या २० लाख कोटींच्या रुपयांच्या पॅकेजचा शेतकऱ्यांना तातडीने कुठलाही दिलासा मिळणार नाही, ही गोष्ट पवारांनी पत्रात नमुद केली आहे. करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता खरीपाची पेरणी करण्यासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे जे पिक नष्ट झाले आहे. त्याच्या नुकसान भरपाईसाठी पॅकेजमध्ये कुठलीही तरतूद केलेली नाही, असे शरद पवार यांनी पत्रातून सांगितले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच दिवस पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपये कोणत्या कोणत्या क्षेत्रात वापरण्यात येणार याबद्दल माहिती दिली. देशातील प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने पैसे, मदत मिळेल यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. मग, देशातील स्थलांतरित मंजूर, शेतकरी, लघु उद्योग, कुटीर उद्योग, शेतकरी, कंपनी, शिक्षण आदीसाठी विशेष योजना आणि आर्थिक मदत जाहीर केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.