HW Marathi
देश / विदेश

मी कर्ज फेडेन पण व्याज देऊ शकणार नाही !

नवी दिल्ली | भारतातील बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्याने अखेर कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावेळी या कर्जावर आकारले गेलेले व्याज आपण देऊ शकणार नसल्याचे माल्याने बँकांना ट्विटद्वारे सांगितले आहे.

विजय माल्याने आज (५ डिसेंबर) सकाळी सलग ३ ट्विट करून भारतीय बँकांची बुडवलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम फेडण्याची तयारी दाखविली असून व्याज देऊ शकत नाही, असे विजय माल्याने या ट्विटमधून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी विजय मल्ल्यावर परदेशातही बेघर होण्याची वेळ आली होती. विजय माल्ल्याचा लंडनमधील रेजेंट पार्क येथील बंगला जप्त करण्यासाठी स्विस बँक यूबीएस एजीने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. परदेशातही कर्जाची परतफेड न केल्याने विजय माल्ल्यासह सिद्धार्थ माल्ल्यावरही हा खटला दाखल करण्यात आला होता.

Related posts

अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांचं निधन

News Desk

काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांना कंठस्नान

News Desk

१५ वर्षाच्या पत्नीसोबत सेक्स ठरणार बलात्कार

News Desk