नवी दिल्ली | “भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या एका मुलाचे बलिदान दिले आहे. मी माझ्या दुसऱ्या मुलालाही देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर पाठविणार आहे. परंतु, पाकिस्तानला धडा शिकवा. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले गेलेच पाहिजे”, अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत.
CRPF Personnel Ratan Thakur's (who lost his life in #PulwamaTerrorAttack ) father in Bhagalpur: I have sacrificed a son in Mother India's service, I will send my other son as well to fight, ready to give him up for Mother India, but Pakistan must be given a befitting reply.#Bihar pic.twitter.com/rI6cM38Agh
— ANI (@ANI) February 15, 2019
देशासाठी प्राण वेचणाऱ्या भारतीय जवानांच्या कुटुंबांवर मात्र मोठे संकट कोसळले आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरु होती. ही बैठक समाप्त झाल्यानंतर आता राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून करण्यात आलेल्या या भीषण हल्ल्याची गंभीर दखल घेत मोदी सरकारने पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.