श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा भारतीय लष्कराने आज (१८ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून लष्कराने दहशवाद्यांना इशारा दिला आहे. काश्मीरमधील तरुणांना दहशवादापासून दूर रहाण्याचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन यांनी आवाहन केले आहे.
Army: In a Kashmiri society,mother has great role to play. Through you, I would request the mothers of Kashmir to please request their sons who've joined terrorism to surrender&get back to mainstream. Anyone who has picked up gun will be killed and eliminated,unless he surrenders https://t.co/bUatb4VOWK
— ANI (@ANI) February 19, 2019
‘‘काश्मीरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करलेल्या मुलांना परत घरी बोलवावे. त्या काश्मिरी तरुणांना त्यांच्या आईंनी चांगले-वाईट काय यांची जाणीव करून देत हा मार्ग सोडून पुन्हा सामान्य जीवनात परत यावे, असे आवाहन लष्कराने काश्मीर तरुणांच्या आई-वडिलांना केले आहे.” तसेच पुढे लेफ्टनंट असे देखील म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यास तो जिवंत राहणार नाही”, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. तसेच या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असाही मोठा खुलासा भारतीय लष्कारने पत्रकार परिषदेच्या वेळीस म्हणाले.
KJS Dhillon, Corps Commander of Chinar Corps, Indian Army: Our focus is clear on counter-terrorism operations. We are very clear that anyone who enters Kashmir Valley will not go back alive. pic.twitter.com/hSXmPoPmwb
— ANI (@ANI) February 19, 2019
”१०० तासांच्या आतमध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आला”, अशी माहिती भारतीय लष्कराने यावेळेस दिली. या चकमकीत जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. मात्र पुलवामा हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि काय प्लानिंग होत, याबाबतची माहिती देण्यास सीआरपीएफने नकार दिला.
KJS Dhillon, Corps Commander of Chinar Corps, Indian Army: There is no doubt that Pakistan Army & ISI is involved. JeM is a child of the Pakistan Army. pic.twitter.com/uGhNkrimQw
— ANI (@ANI) February 19, 2019
पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आले होते. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.