HW News Marathi
देश / विदेश

मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

कारगीलमध्ये शत्रूवर वरचढ ठरणारे भारतीय हवाई दलातील मिग-२७ विमानं आज हवाई दलातून निवृत्त होणार आहेत. जोधपूरच्या एअरबेस सेंटरवर मिग-२७ विमानांच्या तुकडीचा शानदार निरोपसमारंभ होणार आहे. सूर्यकिरण विमानांची एक तुकडी मिग-२७ विमानांना चित्तथरारक कसरती करत निरोप देतील. यानंतर केवळ भारतीय हवाई दलातूनच नव्हे तर जगभरातून मिग-२७ विमानं इतिहासजमा होतील.

कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्‍या सोडून पळ काढावा लागला. मागच्या काही वर्षात मिग-27 च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे 2017 सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला. मिग-27 ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.

‘मिग-२७’ हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान आहे. १९८१ साली पहिल्यांदाच ‘मिग-२७’ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले होते. तब्बल १७०० किमी प्रतितास इतका तुफान वेग असलेल्या या विमानाची चार हजार किलो वजनाची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजींचे कोरोनामुळे निधन

News Desk

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ अण्णा हजारेच्या भेटीला

News Desk