HW News Marathi
देश / विदेश

आलोक वर्मांच्या घराबाहेरून ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे आयबीचे ओळखपत्र ?

नवी दिल्ली | सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. केंद्र सरकारने या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यामुळे आधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आज (गुरुवारी) सकाळी सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांच्या घराजवळ असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांकडे आयबीचे (गुप्तचर विभाग) ओळखपत्र सापडल्याचे हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’ने दिले आहे. या चारही संशयितांवर दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

आज सकाळी आलोक वर्मा यांच्या घराबाहेर या चार जणांना अलोक वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी पकडले आणि त्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्या चारही जणांना ताब्यात घेतले. हे चौघेजण काल रात्रीपासूनच आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर असल्याची माहिती मिळत आहे. या चारही संशयितांच्या आयबीच्या ओळखपत्रांवर त्यांच्या पदाचा उल्लेख केला आहे. पोलीस या चौघांची कसून चौकशी करीत आहेत.

दरम्यान, सीबीआयचे संयुक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अंतरिम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्यामुळे अनेक टीका होऊन मोठा वादंग निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

News Desk

पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा! – नाना पटोले

Aprna