नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताला मोठे यश आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) अखेर हेरगिरीच्या कथित आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करण्यात आले असून कुलभूषण यांचे राजनैतिक अधिकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यालयाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५-१ अशा मोठ्या फरकाने हा निर्णय देण्यात आला आहे. भारतीय दूतावासासह पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ मोहम्मद फैसल आंतराष्ट्रीय न्यायालयात हजर आहेत. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १६ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. या न्यायधीशांपैकी १ भारतीय, १ पाकिस्तानी न्यायाधीशांसह अन्य देशांच्या न्यायाधीशांचा देखील समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात १६ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून हा निर्णय
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती कायम
International Court of Justice verdict: A continued stay of execution constitutes an indispensable condition for the effective review and reconsideration of the conviction and sentence of Mr. Kulbhushan Sudhir Jadhav pic.twitter.com/OwlznZP6of
— ANI (@ANI) July 17, 2019
- कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार होणार
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५-१ अशा मोठ्या फरकाने निर्णय
- फाशीच्या शिक्षेसह पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या सर्व शिक्षांवर स्थगिती
- पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करण्यात आले असून कुलभूषण यांचे राजनैतिक अधिकार कायम राहणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार होणार, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वकील रीमा ओमर यांनी दिली आहे.
The Court has also said that Jadhav’s death sentence should remain suspended until Pakistan effectively reviews and reconsiders the conviction/sentence in light of Pakistan’s breach of Art 36(1) i.e. denial of consular access and notification pic.twitter.com/nfTbAEQ0q8
— Reema Omer (@reema_omer) July 17, 2019
- माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अभिनंदन केले असून हा भारताचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.
I wholeheartedly welcome the verdict of International Court of Justice in the case of Kulbhushan Jadhav. It is a great victory for India. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 17, 2019
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्विट करून कुलभूषण जाधव प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अभिनंदन केले आहे.
I wholeheartedly welcome the verdict of International Court of Justice in the case of Kulbhushan Jadhav. It is a great victory for India. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 17, 2019
- संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देत ‘हा भारताचा मोठा विजय’ असल्याचे म्हटले आहे.
I wholeheartedly welcome the verdict of International Court of Justice in the case of Kulbhushan Jadhav. It is a great victory for India. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 17, 2019
- कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयानंतर कुलभूषण यांच्या मित्र-परिवाराने आनंदोत्सव साजरा केला आहे.
The International Court of Justice ruled in favour of India by 15 votes to 1. #KulbhushanJadhav https://t.co/GVYXOtbJZL
— ANI (@ANI) July 17, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.