नवी दिल्ली | राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र तथा राज्य सरकार आरोग्य यंत्रणेच्यासोबतीने अथक प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोरोनाच्या चाचणीसाठी राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग रोखण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट काम करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आज (२१ एप्रिल) दिली.
States advised not to use rapid testing kits for two days. A lot of variations, kits will be tested and validated by on-ground teams and we will give advisory in the next 2 days: R Gangakhedkar, Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/rWGe5a3T9Z
— ANI (@ANI) April 21, 2020
एका राज्याकडून रॅपिड टेस्टिंग किट बाबत तक्रारी येत होत्या. यानंतर आम्ही बाकी राज्यांकडूनही माहिती घेतली. पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या संस्थेच्या ८ केंद्रांमधील प्रतिनिधींना रॅपिड टेस्ट किटची प्रत्यक्ष तापसणी करण्यासाठी पाठवणार आहोत. यातून त्या किट्स पडताळणी केली जाईल. ते योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही हे बघितले जाईल. तपासणीत रॅपिड टेस्टिंग किट्स फक्त काही बॅचेस सदोष आढळून आली तर ती संबंधित कंपनीकडून बदलून घेतली जातील. दोन दिवसांत आमच्या तपासणी जे काही आढळून येईल याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.