श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या आज (१८ जून) पुलवामा येथे पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले असून दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी आहेत. सुरक्षा जवानांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या ४४ आरआर या मोबाईल व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला होता.
Jammu & Kashmir: Two army personnel who were injured in IED attack on a mobile vehicle patrol of 44 RR in Arihal, Pulwama yesterday, have succumbed to their injuries. (File pic) pic.twitter.com/ukbeHnu26z
— ANI (@ANI) June 18, 2019
काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या २४ तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले असून ९ जवान जखमी आहेत. सोमवारी (१७ जून) दहशतवाद्यांकडून जवानांच्या मोबाईल व्हॅनला आयईडी स्फोटाने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन जवानांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तर जखमी जवानांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सुरक्षा जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे. सोमवारी अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना उत्तर प्रदेशचे सुपुत्र मेजर केतन शर्मा यांना शहीद झाली .
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.