HW News Marathi
देश / विदेश

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

नवी दिल्ली- केंद्र सरकारने सर्व व्यवहारात आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यात बँक खाते, पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांकांचा समावेश आहे. आता तुमचे लायसन्सदेखील आधारकार्डला जोडले जाणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात चाचपणी सुरु केलेली आहे. बनावट लायसन्स शोधून नियम तोडणाऱ्याच्या बँक खात्यातून दंड वसूल करण्याचा त्यामागचा हेतू आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याविषयी माहिती दिली. जर एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियम मोडला तर त्याच्या बँक खात्यातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. एका वर्षभरात ही योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आधार कार्ड सक्तीचे करत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने मात्र, आधार कार्डची सक्ती करण्यास नकार दिला आहे, असे असले तरी सरकार सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून आपले धोरणे जनतेवर थोपत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk

#CoronaVirus | बुलढाण्यात कोरोनाचा राज्यातील ८ वा बळी

News Desk

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालानंतर व्यक्त होणे टाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका

News Desk