नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकटातून कधी मुक्त होणार याची सगळे वाट बघतच आहेत. अशातच आता कोरोना चाचणीसाठी स्वस्तातले किट दिल्लीच्या आयआयटीने विकसित केले आहे. याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.
रमेश पोखरियाल यांच्या हस्ते हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आलं. Newtech Medical कंपनीकडे Corosure या नावाने हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आले आहे. या टेस्टिंग किटची किंमत केवळ ६५० रुपये इतकी आहे.
त्यामुळे सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या इतर चाचण्यांपेक्षा ही चाचणी स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात होऊ शकणार आहे. ‘ही चाचणी स्वस्त झाल्यामुळे चाचण्या होण्याचे प्रमाण आणि चाचण्यांची किंमत यामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे.
या किटच्या मदतीने महिन्याला २० लाख चाचण्या करणे शक्य होणार आहे. तेही अगदी वाजवी दरामध्ये’, अशी प्रतिक्रिया यावेळी आयआयटीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करणे आता खिशाला परवडण्यासारखे देखील होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.