HW News Marathi
देश / विदेश

भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तानसह उत्तर भारत हादरले

नवी दिल्ली | दिल्ली- एनसीआरसह उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आज (२४ सप्टेंबर) दुपारी ४ वाजून ३१ मिनिटाच्या आसपास भूकंपाचे धक्के बसले आहे. भूकंपाच्या धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल असून यात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले.

पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, चंडीगड आणि गुरुदासपूर येथे देखील भूंकपाचे धक्के बसले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद आणि मेरठमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यात हे धक्के जाणवले आहेत.तसेच पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये देखील भूकंपाचे हलके धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

News Desk

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

Gauri Tilekar