HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनचे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड लिपटॉन यांची भेट घेऊन कर्जाची मागणी केली; पण लिपटॉन यांनी पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिला.

‘आयएमएफ’ने नुकतेच पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी पुन्हा कर्जाची मागणी केली. पाकिस्तानने करांचा महसूल वाढवून विकासाची कामे मार्गी लावावीत. यापुढे ‘आयएमएफ’कडे निधीला साकडे घालू नये अशी समज दिली.

अमेरिकेच्या दौऱ्यात इम्रान खान यांनी आर्थिक मदत मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली आहे; पण त्या भेटीचाही काही फायदा झाला नाही, असे संकेत मिळाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे सर्वोच्च न्यायालय पाठविणार? सर्वांचे लक्ष

Aprna

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

News Desk

करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केले नवे व्यासपीठ 

News Desk