HW News Marathi
देश / विदेश

करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केले नवे व्यासपीठ 

नवी दिल्ली | प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कर प्रणालीत पारदर्शकता वाढवण्यासाठी मोदी सरकारने नवे व्यासपीठ सुरू केले आहे. आज (१३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या व्यासपीठाचे लोकार्पण केले. या व्यासपीठाचे ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ असे नाव आहे. या व्यासपीठाच्या लोकार्पणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘हे व्यासपीठ २१ व्या शतकाच्या करप्रणालीची सुरुवात आहे. आजपासून ती लागू होणार आहे. देशाच्या निर्मितीत प्रामाणिक करदाता महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे देशाचाही विकास होत असतो. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्या करदात्यांची मनातील भीती दूर होईल.’

मोदी म्हणाले की, ‘करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. करदाता जागरुक राहतील अशी अपेक्षा सरकारलाही आहे.‘टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या गेल्या ६ ते ७ वर्षात अडीच कोटींनी वाढली आहे. परंतु ही वाढ १३० कोटींच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी झाली आहे. लोकसंख्यपैकी फक्त दीड कोटी लोक कर भरत आहे. यामुळे याबाबत सर्वांनी चिंतन करणं गरजेंच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

News Desk

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

News Desk

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna