HW News Marathi
देश / विदेश

बजेटमध्ये रेल्वेसाठी महत्त्वाच्या घोषणा

नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केले आहे. या बजेटमध्ये रेल्वेसाठी १७ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशनप्रमाणेच आता रेल्वेत ही वायफायची सुविधा देण्यात येणार आहे. यात रेल्वेच्या सोयी-सुविधांत डिजिटलाझेशन करण्यावर मोठा भर दिला आहे.

रेल्वेसाठी खालील तरतुदी

  • – मुंबई लोकलसाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • – रेल्वेची अवस्था सुधारण्यासाठी रेल्वेवर 1 लाख 48 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • – रेल्वेच्या सगळ्या स्थानकांवरील ब्रॉडगेजचे (रेल्वे रुळ) जाळे बदलण्यात येणार आहे.
  • – वाढती लोकसंख्या पाहता मुंबईतील ९० किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे.
  • – सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
  • – 600 रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्यात येणार आहे.
  • – 25 हजारांपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या स्टेशन्सवर सरकते जिने बसवण्यात येणार आहे.
  • – रेल्वेच्या 4 हजार किमीचे विद्युतिकरण करण्यात येईल.
  • – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उघडण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल गांधींनी हे बोलून न्यायालयाचा अवमान केला !

News Desk

देशातल्या व्यापारी संघटनांनकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक

News Desk

काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk
देश / विदेश

मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे

Gauri Tilekar

नवी दिल्ली । मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु या याचिकेमागे कोणताही योग्य हेतू नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. १८ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार आहे, लष्करात भरती होण्याचा अधिकार आहे, तर २१ वर्षापर्यंत लग्नासाठी थांबण्यात काहीच मुद्दा नाही, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.

ही याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सर न्यायधीश रंजन गोगोई, जस्टीस एस.के.कौल व जस्टीस एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. ५० वर्षे वय असलेल्या याचिकाकर्त्याने लग्नाचे वय १८ करण्याची मागणी करू नये, असे मत कोर्टाने नोंदवले आहे. तसेच १८वर्षाचा मुलगा स्वतःहून येईल, तेव्हा या मागणीचा विचार करू असे ही कोर्टाने सांगितले. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Related posts

मोठी बातमी, अनिल देशमुखांवरील आरोपांत तथ्य नाही, राजीनामा होणार नाही – शरद पवार

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More

‘उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा’

News Desk