HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडूत सत्तापालट करणाऱ्या ‘एम के स्टॅलिन’बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

चेन्नई | देशामध्ये काल (२ मे) ५ राज्यांच्या निवडणूकीचा निकाल लागला. एकीकडे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्यास सक्षम ठरल्या तर कुठे इतर पक्षांनी बाजी मारली. असचं, तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने डीएमकेच्या बाजूने कल दिला आहे. एम के स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने मोठे यश मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या अण्णाद्रमुकला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

कोण आहेत स्टॅलिन?

द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन ऊर्फ एम. के. स्टॅलिन यांचा जन्म १ मार्च १९५३ साली झाला. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे ते तिसरे अपत्य. स्टॅलिन हे नाव रशियाचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. स्टॅलिन यांनी चेन्‍नईमधील के. नंदनम ऑर्टस् कॉलेजमधून इतिहास विषयातून पदवी मिळवली.

त्यानंतर २००६ साली ते तामिळनाडू सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि स्थानिक प्रशासनमंत्री बनले. २९ मे २००९ साली स्टॅलिन यांना राज्यपाल सुरजितसिंग बरनाला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. त्यांचे सावत्र भाऊ एम. के. अझगिरी हेसुद्धा राज्यामध्ये मंत्री होते, तर त्यांची सावत्र बहीण कनिमोझी या राज्यसभेत खासदार आहेत.

स्टॅलिन यांची राजकीय कारकीर्द तुम्हाला माहित आहे का?

– स्टॅलिन यांचे राजकीय जीवन १४ व्या वर्षी सुरू झाले. १९६७ साली ते पहिल्यांदा प्रचारात उतरले. १९७३ मध्ये स्टॅलिन यांना द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) च्या कार्यकारिणीमध्ये नियुक्‍त करण्यात आले.

– १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात स्टॅलिन यांना ‘मिसा’खाली तुरुंगवास झाला होता. १९८९ साली चेन्‍नईच्या थाऊजंड लाईटस् मतदारसंघातून विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर 4 वेळा त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. १९९६ मध्ये स्टॅलिन हे चेन्‍नईचे लोकनियुक्‍त महापौर बनले होते.

– २०१६ मध्ये स्टॅलिन हे पुन्हा एकदा महापौर बनले, पण तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कायदेशीर डावपेच खेळून स्टॅलिन यांना पदच्युत केले.

– स्टॅलिन यांनी २००९ साली डीएमके आणि यूपीए युतीला सत्तेत आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

दाक्षिणात्य परंपरेला जागून स्टॅलिन यांनी चित्रपट क्षेत्रातही आपले नशीब आजमावले. १९८० च्या दशकात त्यांनी काही तमिळ सिनेमांत काम केले. १९९० च्या दशकात सन टी.व्ही.वरील काही मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकाच्या आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk

श्रीनगरच्या रुग्णालयातून दहशतवादी फरार

News Desk

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन! – मुख्यमंत्री

Aprna