HW News Marathi
Covid-19

भारतात आता रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला परवानगी! 

नवी दिल्ली | आत्तापर्यंत भारतात कोरोनासाठी कोविशिल्ड आणि कॉवॅक्सिन या दोन लसी दिल्या जात होत्या. मात्र, भारतात आता तिसऱ्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.

रशियाच्या स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे. स्पुटनिक लसीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची माहिती तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचा आरोग्य मंत्रालयाने अंतरिम निष्कर्षांत सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

News Desk

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही! – डॉ. तानाजी सावंत

Aprna

राज्यात आज ११,०८८ नवे रुग्ण आढळले 

News Desk