HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

लंडन | पीएमसी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नीरव मोदीसाठी मुंबईतील तुरुंग योग्य आहे, त्याच्याविरोधात भारत सरकारकडून देण्यात आलेले पुरावे त्याला दोषी ठरवण्यासाठी योग्य आहेत, असे सांगत लंडनमधील नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत.त्यामुळे पंजाब नॅशन बँक घोटाळ्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईल मोठे यश मिळाले आहे.

नीरव मोदी यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये योग्य वैद्यकीय उपचार आणि मानसिक आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्याच्या विरोधात प्रत्यार्पणाच्या आदेशाला नीरव यांनी कोर्टात आ व्हान दिले होते. गुरुवारी दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर लंडनच्या वेस्टमिन्स्टरचे न्यायदंडाधिकारी सॅम्युएल गूजी यांनी नीरव यांच्याविरुद्ध कायदेशीर खटला सुरू आहे, ज्यामध्ये त्यांना भारतीय न्यायालयात हजर राहावे, असा निर्णय दिला.

हजारो कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत आज लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत कोर्टाने आपला निकाल सुनावला. यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, मी भारत सरकारकडून देण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे स्वीकारले आहेत. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत, त्यामुळे या पुराव्यांबाबत मी संतुष्ट आहे.

नीरव मोदीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव

नीरव मोदीने भारतात पंजाब नॅशनल बँकेला १३००० कोटी रुपयांचा चुना लावला होता. याबाबत गुन्हा दाखल होण्यापूर्वी तो देशाबाहेर पसार झाला. यानंतर अंमलबजावणी संचलनालय त्याचे बंगले, महागड्या गाड्या यासर्व गोष्टींवर कारवाई केली होती. ईडीकडून फरार नीरव मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. तर काही मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार होता. मात्र याबाबत नीरव मोदीच्या मुलगा रोहिन मोदी याने आक्षेप घेतला. रोहिन हा लहान असताना नीरव मोदी याने एका ट्रस्ट स्थापन केला होता. लिलाव होणारी काही चित्र रोहिनच्या ट्रस्टची आहे. २००६मध्ये ही चित्र घेतली होती, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा घट

Gauri Tilekar

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

निवडणुकीतील अपयशामुळे सोनिया गांधी नाराज,कोरोना परिस्थितीवरून मोदींवरही बरसल्या !

News Desk