नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याचे एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगतले होते.
Atal B Vajpayee has shown significant improvement in last 48 hrs. His kidney function is back to normal, heart rate,respiratory rate & BP also normal, they're being maintained without support. Hopefully he'll make full recovery in next few days, overall his health is good: AIIMS pic.twitter.com/YXCcVIoQ99
— ANI (@ANI) June 13, 2018
त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. वाजपेयी यांच्या तब्येतीविषयी माहिती देणारे बुलेटीनी देण्याचा निर्णय एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर डॉक्टर वाजपेयींच्या तब्येतीची माहिती देण्यास सुरुवात केली. गेल्या ४८ तासांमध्ये वाजपेयींच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसेच मूत्रपिंड व्यवस्थित काम करत असून रक्तदाब आणि हार्ट रेट देखील चांगले असल्याची माहिती एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.