नवी दिल्ली | ”अल्पसंख्यांकांशी कसे वागावे, हे आम्ही मोदी सरकारला शिकवणार आहोत. भारतात अल्पसंख्यांकांना समान नागरिकत्वाची वागणूक मिळत नाही,” असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने खान यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ”फाळणीत २० टक्के अल्पसंख्यांक पाकिस्तानात गेले होते आणि आता त्यांची संख्या २ टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. दुसरीकडे भारतातील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली आहे,” असे ट्विट करत कैफ यांनी खान यांना खडे बोल सुनावले.
There were around 20% minorities at the time of Partition in Pakistan,less than 2% remain now. On the other hand minority population has grown significantly in India since Independence. Pakistan is the last country that should be lecturing any country on how to treat minorities. https://t.co/6GTr3gwyEa
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 25, 2018
‘समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते,’ असे विधान अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी केल होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केले. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असही ते म्हणाले होते. या विधानाचा आधार इम्रान यांनी मोदी सरकारवर टीका केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.