इस्लामाबाद | भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारतावर टीका केली आहे. भारताने या चर्चेला नकार दिल्यामुळे त्यांनी आता भारताबद्दल संताप व्यक्त करायला सुरुवात केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. परंतु, इम्रान खानच्या या ट्विटला भारतीयांकडून मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याने भारताने पाकिस्तान सोबतच्या या चर्चेला नकार दिला आहे. “मी दिलेल्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानचा शांतेसाठीच्या प्रस्तावाला भारताकडून आलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे मी निराश झालो आहे. भारत गर्विष्ठ आहे. माझे संपूर्ण आयुष्य अशा लहान माणसांनी व्यापलेले आहे जे मोठ्या कार्यालयावर वर्चस्व स्थापन करतात पण त्यांना उद्याची मोठी स्वप्न पाहण्याची दृष्टी नाही,” या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Disappointed at the arrogant & negative response by India to my call for resumption of the peace dialogue. However, all my life I have come across small men occupying big offices who do not have the vision to see the larger picture.
— Imran Khan (@ImranKhanPTI) September 22, 2018
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर शांततेसाठी चर्चा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्याचप्रमाणे इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या बैठकीसाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती केली होती. मात्र, यावर भारताकडून पाकिस्तानला कोणतीही प्रतिक्रिया न दिली गेली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.