HW Marathi
देश / विदेश

मी नव्हे तर ‘तो’ नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असेल !

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत मांडण्यात आला होता. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी शनिवारी (२ मार्च) संसदेत हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, सोमवारी (४ मार्च) खुद्द इम्रान खान यांनी ट्विट करून आपण नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र नसल्याचे म्हटले आहे.

“मी नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन जो व्यक्ती काश्मीरचा प्रश्न निकाली लावेल तो व्यक्ती या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असेल”, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून त्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, असे या प्रस्तावात म्हणण्यात आले होते. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर #NobelPeacePrizeForImranKhan असा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता.

Related posts

इन्स्टाग्राम फीचर्स बदलणार

News Desk

सरकार विरोधी अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचे उत्तर

News Desk

किरण बेदी हिटलर

News Desk