मुंबई। जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्समध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान काश्मीर मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्पना सांगितले. यावर ट्रम्प यांनी म्हटले की, दोन्ही देशाचे पंतप्रधान चांगले असून भारत-पाकिस्तान हा विषय आपसात सोडवू शकतील. आतापर्यंत मध्यस्थी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक माघार घेतली ही गोष्ट पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना सहन झाली नाही.
Imran Khan: If conflict moves towards war then remember both nations have nuclear weapons &no one is a winner in nuclear war and it has global ramifications.Super powers of the world have a huge responsibility..whether they support us or not Pak will go to every extent (file pic) pic.twitter.com/6Rgpg2kscS
— ANI (@ANI) August 26, 2019
यानंतर काश्मीरच्या मुद्यावरून आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्विक हल्ल्याची पोकळ धमकी दिली आहे. काश्मीरवर जर हा मुद्दा चर्चा न करता युद्धपातळीवर गेला तर दोनही देशांकडे लढण्यासाठी अण्वस्त्रांचा साठा आहेच, जगाने साथ दिली वा नाही दिली पाकिस्तान कोणत्याही पातळीवर जाऊ शकते.हे इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली.
Pakistan PM Imran Khan: I will speak at the UN General Assembly on September 27 and highlight the Kashmir issue on world stage https://t.co/MSKs4bspJY
— ANI (@ANI) August 26, 2019
इम्रान खान भारतातील काही विषयांवर बोलताना मोदींवर जोरदार टीका केली. “आरएसएसच्या नजरेत मुस्लमानांसाठी फक्त द्वेष आहे. त्यांचे लक्ष्य हे फक्त हिंदू राष्ट्र स्थापन करण्यावर आहे, याच लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली होती,” असे इम्रान खान यांनी म्हटले. भारतात ज्या प्रकारची हुकूमशाही सुरू आहे, ती साधारण गोष्ट नाही तर यामागे असाधारण अशी विचारधारा असल्याचे इम्रान खान म्हणाले.
आम्ही जगातील सर्वच मुख्य देशांशी या मुद्द्यावरून चर्चा केली आहे. संयुक्त राष्ट्रातही १९६५नंतर पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मी दोन्ही देशांमध्ये शांती नांदावी यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही एफएटीएफसारख्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा घेतलेला निर्णय हा नेहरूंनी काश्मिरींना दिलेल्या आश्वासनापासून पळण्याचा प्रकार आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मोदींनी मोठी चूक केली आहे. आता काश्मिरींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ऐतिहासिक संधी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.