नवी दिल्ली | केवळ दिल्लीतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेाल कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. काही ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काही वेळा पुर्वीच त्यांनी दिल्लीत काय देशभरात लस मोफत मिळणार असल्याचे सांगितले होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस किती टप्प्यात वितरीत केली जाईल याची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. त्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोनन कोटी फ्रंटलाईन वर्करचा समावेश असेल. प्राथमिकता यादीतील इतर २७ कोटी लोकांना जुलैपर्यंत लस देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
In 1st phase of #COVID19Vaccination free #vaccine shall be provided across the nation to most prioritised beneficiaries that incl 1 crore healthcare & 2 crore frontline workers
Details of how further 27 cr priority beneficiaries are to be vaccinated until July are being finalised pic.twitter.com/K7NrzGrgk3— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) January 2, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.