मुंबई | अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) सीमेवर 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या तवांग सेक्टरमधील सीमाभागात भारत आणि चीन सैन्यातील झटापटीत दोन्ही देशाचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळली आहे. या घटनेत दोन्ही देशांचे एकूण 30 सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर भारत आणि चीन दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, यात कोणत्या बाजुने काय हानी झाली ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि सरकार यांच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.
On 9th Dec 2022, PLA troops contacted the LAC in Tawang Sector of Arunachal Pradesh which was contested by Indian troops in a firm and resolute manner. This face-off led to minor injuries to a few personnel from both sides. Both sides immediately disengaged from the area: Sources pic.twitter.com/vQLXcM3xLS
— ANI (@ANI) December 12, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.