तिरुअनंतपुरम | मुसळधार पावसाने सध्या केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील पूरात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसाने एका दिवसात तब्बल १०६ जणांचा बळी घेतला आहे. जोरदार पावसामुळे आतापर्यंत केरळमध्ये ८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या केरळमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी अशी परीस्थित निर्माण झाली आहे.
सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री राज्यात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
#WATCH Navy delivers relief material to stranded people in a flooded area of Kochi. #Keralafloods pic.twitter.com/dC8Lp78e8q
— ANI (@ANI) August 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.