HW News Marathi
देश / विदेश

एका दिवसात 32 ड्रग माफियांना धाडले यमसदनी

मनिला- फिलीपाईन्स या देशाला ड्रग माफियांनी वेढून टाकले आहे. त्यामुळे तेथील सरकार हैराण असून नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने या माफिया राज विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. याचंच एक भाग म्हणून केवळ 24 तासांत 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
66 ठिकाणी पोलिसांनी ग्राहक बनून ड्रग्ज खरेदी करण्याची ‘बाय बर्स्ट’ योजना आखली होती. त्यात 20 ठिकाणी ‘बाय बर्स्ट’ ऑपरेशनदरम्यान तर 14 ठिकाणी शोधमोहिमेदरम्यान चकमक उडाल्याची माहिती पोलीस अधिका-याने दिली. त्यात एकूण 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग माफियांविरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. त्यांनी जून 2016 मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकण्यात आलं आहे.
मंगळवारी फिलीपाईन्समध्ये ड्रग्ज माफियांविरोधात करण्यात आलेली कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून एका रात्रीत इतक्या जणांना ठार करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. 32 जणांना ठार करण्यात आलं असून 107 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, मग चर्चा – काँग्रेस

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’विमानतळ करण्यास मान्यता !

Arati More
देश / विदेश

या समुद्रात बुडून दाखवाच!

News Desk

पाहा ‘डेड सी’ची गंमत या व्हिडिओमध्ये. . .

पोहोता येत नसेल, तर समुद्रच काय विहिरीकाठी जातानाही अनेकांच्या काळजात धस्स होतं! उसळणाऱ्या लाटा आणि फेसाळणाऱ्या दर्यावर पोहोयला तर भलेभले तरणपटूही धजावत नाहीत. पण जराही पोहोता येत नसेल. . . तुम्ही समुद्रात पडलात आणि तरीही बुडाला नाहीत, उलट कागदासारखे वर तरंगत राहिलात तर?

अशक्य वाटतयं ना हे सगळं, एखाद्या परीकथेसारखं. . . पण ही परीकथा नव्हे, हे १०० टक्के वैज्ञानिक सत्य आहे. कुणालाही न बुडविणारा समुद्र जगात अस्तित्वात आहे. जॉर्डन आणि इस्रायल या दोन देशांमध्ये हा समुद्र असून तो ‘डेड सी’ नावाने ओळखला जातो. या समुद्रात कुणी बुडत नाही आणि हा काही चमत्कार नव्हे. त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. या समुद्रात क्षारांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे त्याच्या पाण्याची घनताही अधिक आहे. परिणामी मानवी वस्तुमान हे पाणी सहज तोलून धरते. म्हणून तुम्ही कसेही जाऊन समुद्रात पडलात, तरीही बुडण्याची शक्यता मूळीच नसते.

विशेष म्हणजे या समुद्राच्या पाण्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचेसाठी हे पाणी आणि किनाऱ्यावरील चिखल फारच उपयुक्त मानला जातो. त्यामुळे डेड सीपासून बनविलेली अनेक सौंदर्य प्रसाधनेही बाजारात उपलब्ध आहेत.

 

 

Related posts

बस दरीत कोसळून 30 ठार

News Desk

आधार कार्ड वैधच, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Gauri Tilekar

सीबीआयच्या नव्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती

News Desk