चेन्नई | तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ नोव्हेंबर)ला धडकले आहेत.
Tamil Nadu: Trees uprooted and houses damaged in Nagapattinam in the overnight rainfall and strong winds which hit the town. #GajaCyclone pic.twitter.com/9ObvcqJlDD
— ANI (@ANI) November 16, 2018
किनारपट्टी भागातील ७६ हजार २९० लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. या चक्रीवादळात गेल्या दोन तासात अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
The eye of #GajaCyclone is now making a landfall. It will take 1 hour for it to fully cross from sea to land. The intensity of the wind will be less when the eye of cyclone falls on land and it will increase again gradually: Chennai MeT department pic.twitter.com/aBzyndFL9f
— ANI (@ANI) November 15, 2018
येत्या २४ तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.