HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे एक वेगळाच विक्रम !

दिल्ली -आपल्या वेगवेगळ्या आश्वासनानी देशाचे लक्ष वेधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अनोखा विक्रम आहे भाषणबाजी करण्याचा. मोदींनी दर महिन्याला सरासरी १९ भाषणे केली आहे. तर गेल्या ४१ महिन्यात एकूण ७७५ सार्वजनिक सभांमधून ७७५ भाषण ठोकली आहेत.

नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी दोन भाषणे ठोकली आहेत. २०१५ साली त्यांनी सर्वाधिक २६४ भाषणे दिली आहेत. मोदींच्या परदेश वाऱ्याही चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी परदेशातही एक दोन नाही तर तब्बल १६४ भाषणे ठोकली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधानांच्या या अनोख्या विक्रमाचे समर्थन केले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे दर महिन्याला सरासरी ११ भाषणे दिली आहे. त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी १४०१ भाषणे दिली आहेत. त्यात मोदींचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. मोदींच्या भाषणबाजीवर काँग्रेसने मात्र जोरदार टिका केली आहे. मोदींचे लक्ष सरकार चालवण्याकडे नाही तर भाषण देण्याकडेच अधिक असल्याचे काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदूत्व हाच मोदी सरकारचा खरा अजेंडा

News Desk

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk

भाजपकडून विधान परिषदेचे ‘४’ उमेदवार जाहीर, खडसे अन् पंकजा मुंडेंना मोठा धक्का

News Desk