HW News Marathi
देश / विदेश

तैवानमध्ये गेल्या 24 तासांत भूकंपाचे तीव्र धक्के; रस्त्यांना तडे आणि पूल कोसळले

मुंबई | गेल्या 24 तासांत तैवानमध्ये (Taiwan Earthquake) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. तैवानमध्ये आज (18 सप्टेंबर) 7.2 रिश्टर स्केल भूकंप आला तर काल (17 सप्टेंबर) 6.4 रिश्टन स्केलचे भूकंपाचे हादरे बसले आहे. या भूकंपामुळे तैवानमध्ये रस्त्यांना तडे गेले असून पूल कोसळले आहेत. तर तैवानमधील डोंगली स्थानरावर ट्रेन रुळावरुन खाली उतरली असून स्थानकांचे छतही कोसळले आहे. या भूकंपाचे धक्क्याने रुळावरील रेल्वेही हालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तैवानमधील दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंट हे भूकंपाचे मुख्य केंद्र अल्याची माहिती तैवानच्या हवामान विभागाने दिली आहे. परंतु, या भूकंपाच्या तीव्रतेमुळे अद्याप जिवितहानी झालेल्याचे वृत्तसमोर आले नाही. या भूकंपाचा जास्त प्रभाव तैवामधील ताइनान आणि काओसंग या ठिकाणी जाविला नाही.

तैवान हा रिंग ऑफ फायर परिसरात येत असून भौगिलक कारणामुळे या ठिकाणी सर्वांधिक भूकंप होतात. तैवानमध्ये २०१६ मध्ये आलेल्या भूकंपात १०० लोकांचा मृत्यू झाला होता. १९९९ मध्ये आलेल्या ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात २००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींचा आज 68 वा वाढदिवस

News Desk

#PulwamaAttack : देशभरातील ‘या’ जवानांनी पत्करले वीरमरण

News Desk

नवे केंद्रीय आयटी मंत्री वैष्णव यांनी ट्विटरला खडसावलं

News Desk