HW News Marathi
देश / विदेश राजकारण

गुजरातसाठी भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election )रणधुमाळी रंगू लागली आहे. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. पुन्हा गुजरातमध्ये भगवा फडकविण्यासाठी भाजपने त्यांच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक त्यांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान, भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल या दोघांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. परंतु, रुपाणी आणि पटेल हे दोघेही गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते. गुजरात विधानसभा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यात गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची अशी आहे यादी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
  • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
  • तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  • आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील
  •  अभिनेता परेश रावल
  • खासदार रवी किशन
  • भाजप खासदार हेमा मालिनी
  • खासदार मनोज तिवारी
  • भोजपुरी गायक दिनेश लाल यादव निरहुआ

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री. शिवकुमार स्वामी यांचे निधन

News Desk

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू

News Desk

दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

News Desk