HW News Marathi
देश / विदेश

NSE माजी CEO चित्रा रामकृष्ण यांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी

नवी दिल्ली | एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरी आयकर विभागाने आज छापेमारी केली आहे. एनएसई संबंधित गुप्त माहिती अज्ञात साधूला दिल्याप्रकरणी आयकर विभागाने चित्रा रामकृष्ण यांच्या घरी छापा मारले. चित्रांनी आर्थिक लाभासाठी हे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रांना एसबीआयने त्यांना ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. चित्रा यांच्यासोबत सुब्रमण्यम यांच्यावरही आयकर विभागाने धाड टाकली. चित्रा या २०१३ पासून २०१६ कालावधीत एनएसईच्या सीईओ होत्या. 

एनएसईमध्ये दररोज ४९ कोटीचे आर्थिक व्यवहार होतात. एनएसईचा एका दिवसाचा टर्नओव्हर ६४ हजार कोटी रुपये असा आहे. एका अज्ञात साधूच्या सांगण्यावरून चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईचा कारभार चालत होता, असे गेल्या काही दिवसापूर्वी मोठा खुलासा झाला होता. यानंतर देशभरात एकच खळबळ माजली होती. या अज्ञात साधूच्या सांगण्यावरुन आनंद सुब्रमण्यम यांना चीफ सेक्रेटरी ऑफिसर पदावर नियुक्ती केली. यापूर्वी एनएसईमध्ये असे कोणतेही पद नव्हते. यापूर्वी सुब्रमण्यम यांनी बाल्मर लॉरी येथे काम केले होते. तेव्हा सुब्रमण्यम यांना १५ लाख रुपये होता. परंतु, सुब्रमण्यम हे एनएसईमध्ये आल्यानंतर त्यांना १.३८ कोटी रुपयाचे पॅकेज दिले गेले. आणि त्यांना सलग प्रमोशन देण्यात आले. सुब्रमण्यम यांना चित्रा रामकृष्ण यांनी खूप सवलती दिल्या होत्या. चित्रा या अज्ञात साधूच्या सांगण्यावरू करत होत्या. तर त्या ईमेलद्वारे चित्रा साधूशी संपर्कात होत्या, अशी माहिती त्यांनी दिली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात आज ईदचा उत्साह !

News Desk

मुखमैथुन गंभीर गुन्हा, आज कोर्टाचा निर्णय

News Desk

भाजपला जेव्हा कोणी विचारतही नव्हतं तेव्हा आमच्या कुटुंबाने ….! । प्रीतम मुंडे

News Desk