नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सण उत्सव याचे स्वरूप बदलले. भारताचा स्वातंत्र्यदिन हा देखील एक सोहळाच आहे. मात्र, यंदा हा सोहळा वेगळ्या स्वरूपात होणार आहे. आज (१३ ऑगस्ट) १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची परेड तालीम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच बदल करण्यात आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलसह १५ ऑगस्टच्या परेडची संपूर्ण ड्रेस रिहर्सल होत आहे.
Delhi: Full dress rehearsal for 74th Independence Day celebrations was held at Red Fort today morning pic.twitter.com/nErvjKntVt
— ANI (@ANI) August 13, 2020
ही तालीम पूर्ण ड्रेस, मास्क आणि सामाजिक अंतर ठेवून करण्यात आली. कोरोनामुळे १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात आली आहे. यावेळी पाहुण्यांची यादी कमी करण्यात आली आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी लोकांना लांब लांब बसवण्याची योजना करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेळी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी ओपन पास दिले जाणार नाहीत.
तटबंदीच्या दोन्ही बाजूला फक्त १५० पाहुणे असतील. पूर्वी, दरवर्षी अशा अतिथींची संख्या ३०० ते ५०० होती. सोहळ्यामध्ये यंदा बरेच बदल दिसतील. कार्यक्रमाचा कालावधी मात्र कमी करण्यात आलेला नाही.यावेळीही आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे जवान पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देतील. त्यांच्यामध्ये २२ जवान आणि अधिकारी असतील. त्याच वेळी, राष्ट्रीय सलामीसाठी दिल्ली पोलीस कर्मचार्यांसह ३२ सैनिक आणि अधिकारी असतील. कोरोना प्रोटोकॉलमुळे, हे जवान ४ ओळींमध्ये उभे राहतील आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.