HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ६६,९९९ नवे रुग्ण आढळले तर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी !

नवी दिल्ली | गेल्या २४ तासांत देशात ६६,९९९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात ६ लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरु आहेत. याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर १४.९ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानी असलेल्या ब्रिटनलाही भारतानं मागे सोडलं आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

News Desk

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Aprna

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ

News Desk