HW News Marathi
Covid-19

देशात सलग दुसऱ्या दिवशीही ६० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. २ दिवसांपासून देशात ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ६१ हजार ५३७ रुग्ण आढळले आहेत. तर ९३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. ६ लाख १९ हजार ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, काल (७ ऑगस्ट) देशात ५ लाख ९८ हजार ७७८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ७ ऑगस्टपर्यंत देशात दोन कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरात ३० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण, अमेरिका, स्पेनसह इटलीमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या

News Desk

कोरोना रुग्ण वाढल्यास पश्चिम बंगालसारखा महाराष्ट्रालाही निर्णय घ्यावा लागेल! – विजय वडेट्टीवार

Aprna

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ हजार २८१, तर जगभरातील देशाच्या यादीत १२ व्या क्रमांकावर

News Desk