HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ६०,९६३ नवे रुग्ण तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला 

मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६०,९६३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १६ लाख ३९ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४६,०९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

केंद्रातले ‘हे’मंत्री आजपर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले ! पाहा यादी…

swarit

रविवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून २,०२० लोकल फेऱ्या सुरु होणार 

News Desk