नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढतच चालला आहे. सलग चौथ्या दिवशी देशात करोना रुग्णांच्या संख्येत ७५ हजारांहून अधिक वाढ झाली असून गेल्या २४ तासांत ७८,७६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. ७ ते २३ ऑगस्ट या काळात रुग्णांची संख्या १० लाखांनी वाढली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५,४२,७३४ इतकी झाली आहे. यापैकी ७,६५ ,३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
India's #COVID19 case tally crosses 35 lakh mark with a spike of 78,761 new cases & 948 deaths in the last 24 hours.
COVID-19 case tally in the country stands at 35,42,734 including 7,65,302 active cases, 27,13,934 cured/discharged/migrated & 63,498 deaths: Health Ministry pic.twitter.com/Nx66Q72yQp
— ANI (@ANI) August 30, 2020
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २७,१३,९३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ७६ % आहे. गेल्या २४ तासांत देशात ९४८ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातीव एकूण ६३,४९८ इतक्या जणांचा मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.