HW News Marathi
Covid-19

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

नवी दिल्ली | भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी कोरोनावर सुखरूप मात केली आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ६ राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या राज्यात आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक बातमी ! बीड जिल्हा झाला कोरोनामुक्त

News Desk

हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका ! आरोग्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

News Desk