HW News Marathi
Covid-19

देशात २४ तासांत तब्बल ८१,४४६ नवे रुग्ण, परिस्थिती चिंताजनक!

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे. एका दिवसात नोंद होणारी ही गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे. तर १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ६ लाख १४ हजार ६९६ अॅक्टिव्ह केसेस असून मृतांच्या संख्या १ लाख ६३ हजार ३९६ इतकी झाली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात सलग करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. करोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आरटी-पीसीआर टेस्टचा दर १००० वरुन ५०० वर आणला आहे.

राज्यात ४३,१८३ नवे रुग्ण, २४९ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ४३,१८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८,६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३,६६,५३३ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृत्यूचं थैमान! देशात कोरोनाबळींचा नकोसा नवा उच्चांक तर बाधितांच्या संख्येत घट

News Desk

स्वत: काही न करता सोनू सूदवर टिका,हाचं तुमचा माणुसकीचा धर्म का ?

News Desk

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं ? हा निर्णय आपणच घ्यायचा !

News Desk