HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, २४ तासांत आढळले ३ लाखांच्या पुढे रुग्ण

नवी दिल्ली | भारतात कोरोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत ३ लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या १ लाख होती नंतर ती २ लाखांच्या पुढे गेली आणि आता तर ती ३ लाखांच्या पुढे गेल्याने चिंता अधिक वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १४ हजार ८३५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही. भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राकडून मिळणाऱ्या लसीचा साठा शासकीय लसीकरण केंद्राला मिळणार, राज्य सरकारचा मोठा मिर्णय

News Desk

दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह ८ रूग्णांचा मृत्यू

News Desk

नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.९९%

News Desk