नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासात ३२,६९५ नवे रुग्ण आढळले असून, २०, ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Highest single day spike of 32,695 #COVID19 cases and 606 deaths reported in the last 24 hours in India.
Total positive cases stand at 9,68,876 including 3,31,146 active cases, 6,12,815 cured/discharged/migrated and 24,915 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/nuYhpfMQtz
— ANI (@ANI) July 16, 2020
बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच, देशात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.