नवी दिल्ली | देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४ लाख २६ हजार १६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
गेल्या २४ तासांत देशात ४५,७२० रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंत वाढलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. १ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ इतकी झाली आहे. देशात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे.
India's #COVID19 case tally crosses 12 lakh mark with highest single-day spike of 45,720 new cases & 1,129 deaths in the last 24 hrs
Total #COVID19 positive cases stand at 12,38,635 incl 4,26,167 active cases, 7,82,606 cured/discharged/migrated & 29,861deaths: Health Ministry pic.twitter.com/PsNwAozRT0
— ANI (@ANI) July 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.