नवी दिल्ली | देशात अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर कोरोनासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या २४ तासांमधे देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचं समोर आलं आहे. ४१ हजार ६४९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.
नव्याने सापडलेल्या ४१ हजार ६४९ कोरोनाबाधितांमुळे आता भारतात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांचा आकडा ३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ इतका झाला आहे. मात्र, त्यापैकी सध्या फक्त ४ लाख ८ हजार ९२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ४ लाख २३ हजार ८१० इतका झाला आहे. मात्र, देशपातळीवर गेल्या काही दिवसांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्ये झालेली घट पाहाता हा काही प्रमाणात आरोग्य यंत्रणांसाठी दिलासा मानला जात आहे.
India reports 41,649 new #COVID19 cases, 37,291 recoveries, and 593 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 3,16,13,993
Active cases: 4,08,920
Total recoveries: 3,07,81,263
Death toll: 4,23,810Total vaccination: 46,15,18,479 pic.twitter.com/ZwC3fUVTu4
— ANI (@ANI) July 31, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.