नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनामुळे २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आपल्या देशातील रिकव्हरी रेट हा ६३.२५ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोगयमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली. देशातील जे रुग्ण आहेत त्यातल्या बहुतांश रुग्णांमध्ये किरकोळ लक्षणे आहेत. ०.३२ टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. तर ऑक्सिजन द्यावा लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे असे प्रामुख्याने आरोग्यमंत्र्यांना सांगायचे होते.
जीत के समीप भारत !
देश में #COVID19 से उत्पन्न स्थिति की चर्चा करते हुए मैंने कहा कि
हमारा रिकवरी रेट 63.25% पर पहुंच गया है ।
देश में #COVID19 संक्रमण के ज़्यादातर मामले मामूली लक्षण वाले हैं।मात्र 0.32% मरीज़ #Ventilator पर हैं और 3% से भी कम मरीज़ों को #oxygen की जरूरत है pic.twitter.com/QWVHPWvWr4— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) July 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.