नवी दिल्ली | कोरानाचा दुसरा स्ट्रेन भारतातही आल्याने आता चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत युकेला जाणारी विमानसेवा स्थगित केली होती, त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता युकेला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण ७ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आले आहे.
A decision has been taken to extend the temporary suspension of flights to & from the United Kingdom till 7 January 2021: Union Civil Aviation Minister Hardeep Singh Puri pic.twitter.com/LgjsSSLxFM
— ANI (@ANI) December 30, 2020
हरदीपसिंग पुरी म्हणाले की- ‘ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की ७ जानेवारी २०२१ रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जातील. 22 डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमानं 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी २० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या २० जणांपैकी ८ जण हे दिल्लीमधील आहेत. तर मेरठमध्ये २ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहेत.
Total of 20 persons have been found with the mutant variant of SARS- CoV-2 virus reported from the United Kingdom. These include the six persons reported earlier (3 in NIMHANS, Bengaluru, 2 in CCMB, Hyderabad and 1 in NIV, Pune): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/JR0gZ1RiNH
— ANI (@ANI) December 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.