HW News Marathi
Covid-19

ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी ७ जानेवारीपर्यंत कायम

नवी दिल्ली | कोरानाचा दुसरा स्ट्रेन भारतातही आल्याने आता चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत युकेला जाणारी विमानसेवा स्थगित केली होती, त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता युकेला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण ७ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आले आहे.

हरदीपसिंग पुरी म्हणाले की- ‘ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की ७ जानेवारी २०२१ रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जातील. 22 डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमानं 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी २० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या २० जणांपैकी ८ जण हे दिल्लीमधील आहेत. तर मेरठमध्ये २ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरीमध्ये स्वतंत्र ५० बेडच्या रूग्णालयास मंजुरी

Aprna

‘एन-95’ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे

swarit

महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी

News Desk