HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, लॉकडाऊनसंदर्भात होणार चर्चा

नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवला होता. मात्र, या कालावधीत देखील कोरोना फैलाव वाढत आहे. त्यामुळे आता देशातील दुसरा लॉकडाऊन संपण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज (२७ एप्रिल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्वा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सध्याच्या परिस्थितीचा आढावा जाणून घेणार आहे.

या बैठकीत राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यांच्या विविध मागण्या, रेल्वेची सेवा सुरू करण्यासह मजुरांच्या पलायनाच्या विषय, उद्योग सुरू करणे, रुग्णालयातल्या सुविधांविषयी मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेतील. या सर्व गोष्टीवर आज मोदी चर्चा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीनंतर देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.

मोदींनी आतापर्यंत दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांनी ११ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह धरला होता. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणाही केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण

News Desk

रुग्णालय स्वच्छता,ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश              

News Desk

“राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार?”, मोदींचा राज्यांना सवाल

News Desk