HW News Marathi
Covid-19

कोरोनावरील कोवाक्सिन लस भारतात १५ ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता

नवी दिल्ली | कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी भारतात तयार केली जात असलेली कोवाक्सिन (Covaxin) १५ ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनी जी ही लस तयार करत आहे त्यांना १५ ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआर (ICMR) ने दिले आहेत. ७ जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या ट्रायलचे निष्कर्ष लवकर आल्यास १५ ऑगस्टपर्यंत लस लॉन्च केली जाऊ शकेल, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ ही लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा, आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

News Desk

राज्यात ५ टप्प्यांत जिल्हे होणार अनलॉक! विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा

News Desk