HW News Marathi
देश / विदेश

ट्रम्पनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ‘या’ गोष्टीसाठी भारताचे मानले आभार

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात दिवसेंदिवस वाढ आहे. कोरोनावर अद्याप औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषध कोरोना रुग्णांवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारताने नुकतेच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली असून भारताने अमेरिकेसह इतर देशातंना यांची निर्यात केली आहे. भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पाठोपाठ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

नेतान्याहू यांनी ट्वीटमध्ये म्हणाले की, “धन्यवाद, माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची निर्यात केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. इस्रायलच्या सर्व नागरिकांतर्फे धन्यवाद,” असे ट्वीट त्यांनी केले आहे. भारताने इस्त्रायलसाठी पाच टन औषधांची निर्यात केली आहे. यामध्ये मलेरियावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा समावेश आहे.

इस्रायलमध्ये १० हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ८६ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. इस्रायलमधील १२१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.नेतान्याहू आणि मोदी यांची ३ एप्रिलला फोनवर चर्चा झाली होती. यादरम्यान मोदींसोबत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन चर्चा झाल्याचे बोल्याचे उल्लेख नेत्यनाहूनी ट्वीटमध्ये केला आहे.

भारताने आम्हाला केली ही मदत कधीच विसरणार नाही | ट्रम्प

ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, संकटमय मित्रांच्या मदतीला धावून येण्याची गरज असते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या आम्हाल औषध पुरवण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे भारत आणि भारताच्या लोकांचे आभार. भारताने आम्हाला केली ही मदत कधीच विसरणार नाही. ट्रम्प यांनी मोदींना टॅग करत लिहिले की, कोरोन विरूद्धच्या या लढाईमध्ये मोदी फक्त भारताची नाहीतर मानवतेची मदत करत आहेत. यासाठी ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1247950299408498693?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

‘जागतिक मानक दिन’ का साजरा केला जातो, वाचा सविस्तर…

News Desk

आठ वर्षाची चिमुकली म्हणाली लंटाईमध्ये शिक्षक रोज वरच्या खोलीत नेतात, माझ्याशी घाण काम करतात

News Desk