HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशात एका दिवसात कोरोना रुग्णसंख्येने पार केला १ लाखांचा आकडा 

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात आत्तापर्यंतचा मोठा आकडा वाढला आहे. एकाच दिवशी १ लाख ०३ हजार ५५८ संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. या दिवशी ५२ हजार ८४७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. एकाच दिवशी तब्बल ४७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशात यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० ला सर्वाधिक संख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी देशात एका दिवसात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज (५ एप्रिल) हा आकडा लाखाच्या पुढे गेल्याने चिंता अधिक वाढली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५७,०७४ नवे रूग्ण आढळले आहेत. तर, २२२ रुग्णांचा मृत्यु झाला असून २७,५०८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर दुसरीकडे मुंबईत ११,१६३ नवे रूग्ण आढळले आहेत. तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ५२६३ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारने आजपासून (५ एप्रिल) कडक निर्बंध लागू केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझी मैत्रीण लवकर बरी व्हावी’ चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांसाठी केली प्रार्थना !

Arati More

आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार, लॉकडाऊनबद्दल काय निर्णय होणार?

News Desk

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

News Desk